" स्वप्नांचा महोत्सव "

जर माझ्या डोळ्यात एक्सरे   मशीन असतं तर ....  
प्रत्येकाच्या  मनातले भाव  
मला चटकन  समजले असते 
सर्वांच्या  मनाजोगते  मी  वागु  शकली असती  !
जर  माझ्या  ह्रिदयात झेरॉक्स  मशीन असतं तर ...... 
चांगल्या  आठवणींची  एक झेरॉक्स कॉपी च  काढून ठेवली असती 
सर्व चांगल्या आठवणीने भरलेला ह्रिदयात 
निरर्थक गोष्टींना स्थान च मिळालं नसतं  !
मी स्वतः एक मोबाईल  असती तर ?
पाहिजे ते डाउनलोड करा 
नको त्या गोष्टी डिलीट करा 
मनाजोगते म्युझिक ऐका 
मग आयुष्य किती सुंदर असतं !
कोणाबद्दल राग नाही  ,काही अपेक्षा नाही ,तक्रार नाही . 
ऑल इस वेल !!!
आणि सर्वांच्या आनंदात सहभागी असुन सुद्धा 
माझ्या डोळ्यातील  कोपऱ्याचे अश्रू 
माझ्या दडलेल्या स्वप्नांचा ,
मूक शब्दांचा महोत्सव साजरा करत असतील !!

Comments

Popular posts from this blog

'नारी तेरे रूप अनेक ''

ऑंसु

क्या जीवन का कोई उद्देश्य है ???