Posts

Showing posts with the label Marathi

" स्वप्नांचा महोत्सव "

जर माझ्या डोळ्यात एक्सरे   मशीन असतं तर ....   प्रत्येकाच्या  मनातले भाव   मला चटकन  समजले असते  सर्वांच्या  मनाजोगते  मी  वागु  शकली असती  ! जर  माझ्या  ह्रिदयात झेरॉक्स  मशीन असतं तर ......  चांगल्या  आठवणींची  एक झेरॉक्स कॉपी च  काढून ठेवली असती  सर्व चांगल्या आठवणीने भरलेला ह्रिदयात  निरर्थक गोष्टींना स्थान च मिळालं नसतं  ! मी स्वतः एक मोबाईल  असती तर ? पाहिजे ते डाउनलोड करा  नको त्या गोष्टी डिलीट करा  मनाजोगते म्युझिक ऐका  मग आयुष्य किती सुंदर असतं ! कोणाबद्दल राग नाही  ,काही अपेक्षा नाही ,तक्रार नाही .  ऑल इस वेल !!! आणि सर्वांच्या आनंदात सहभागी असुन सुद्धा  माझ्या डोळ्यातील  कोपऱ्याचे अश्रू  माझ्या दडलेल्या स्वप्नांचा , मूक शब्दांचा महोत्सव साजरा करत असतील !!

'तुझी आठवण'

तुझी आठवण माझ्या मनापाशी लपून बसली आहे निघायला च तयार नाही खर तर - मी ते काढायचा अजून प्रयत्न च केला नाही कदाचित करणार ही  नाही का ?ते नको विचारूस कारण तुला -----हो फक्त तुला च  मी ते  सांगु   शकणार नाही

'तू च सत्य'

तुम्हाला पाहून वाटलं नह्व्त कि तुम्ही च ते ! ज्यांना मी आजपर्यंत शोधत आले माझ्या स्वप्नात जीवनात !          कुठे होते तुम्ही आजपर्यंत ?          कधी मला भेटायची ,          शोधायची ,          इच्छा नाही  झाली का ? मी तर माझे सगळे स्वप्न , माझं पुढचं आयुष्य आणि स्वतःला आता तुमच्या स्वाधीन करत आहे          माझ्या कल्पनेच्या कवितेला          एक नवीन सत्य लाभला आहे          आणि तुम्ही ?          तुमच्या हृदयात  काय चालले आहे ? मी वाट पहाते तुमच्या  उत्तराची !!

'राजा ची राणी'I

तुम्ही आले आणि माझ्या जीवनात ---- प्रेमाचा प्रकाश झाला  !         आजपर्यंत         मी एखाद्या गुढ  रात्री सारखी         निवांतपणे         थंडगार वारा ओढून          झोपतच  होती ! मला काही उत्साह ,उमंग किंवा विशेष भावना जणू नहोत्या . अगदी निराश होती         आता मात्र हे जग जगण्यासारखं  वाटते .          सगळीकडे सौंदर्याचा सागर फेलावला आहे          असे आढळते जसे ह्या आनंदाच्या  साम्राज्यात          मी एका साम्राग्नी  सारखी महालते -----           एका राजा ची राणी !!!