'कधी कधी'
कधी कधी जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत प्रेमसागर उमडलेला भासतो …. जसे काही सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्मित होत असलेले दिसते आणि म्हणूनच मन प्रफुल्लीत रहाते ,फक्त काही क्षणांसाठी का होईना मी सर्वान र्सोबत खेळी -मेळी ने रहाते ,स्वतः हसू शकते आणि दुसऱ्यांनाही हसवू शकते .पण उदास होण्यासाठी मला काही ही करावे लागत नाही क़ोणी काही बोललं किंवा मनाविरुद्ध झाले कि मग मी कुणाशी हि चांगले वागू शकत नाही . मी हे जाणते कि माझ्यात कोणकोणती प्रतिभा आहे ,पण त्याचे वास्तविक जीवनात उपयोग कशे करावे त्या बद्दल मी अनभिग्न आहे . त्या मुळे मी जेव्हा काही चांगलं करायला जाते ,माझ्याच अबोधते मुळे मी सर्वांच्या उपहासाचे निमित्त बनते, पुन्हा एकदा मी मागे पडते !
Comments