शाळा पूर्ण झाली आणि एका नवीन प्रवासासाठी मी तयार झाली. मनात खूप नवीन स्वप्न मी रंगवलेली होती . माझ्या मनात काही भीती पण होत्या. शाळेतल वातावरण खूप वेगळं होतं. शिक्षक थोडे कडक होते. आता कॉलेज मध्ये सगळं कसं असणार याची सतत मनात धास्ती होती आणि नवीन जग हे कसं असेल त्या बद्दल मनात मी खूप कल्पना पण केल्या होत्या . आता मला युनिफोर्म घालायची बंदी नाही दोन वेण्या घालायचं बंधन नाही. पाहिजे तसं तयार होऊन मी जाऊ शकत होती. मला जे काही नवीन स्वातंत्र्य मिळणार होतं त्या साठी मी खूप आनंदात होती पण मी हे विसरली होती कि स्वातंत्र्या बरोबरच माझ्यावर नवीन जवाबदारी पडेल,मला स्वतःला जास्त हुशार,पाकट बनवायला लागेल. अभ्यासा बरोबर मला इतर प्रव्रुतित पण भाग घ्यायला लागेल. एकट प्रवास करणं, पैसे संभाळणं ,हिशोब ठेवणं ,स्वतःची वस्तू संभाळणं हे सगळं मला हळू हळू समजलं.जेवढं हे सगळं सोपं वाटतं तेवढं ते सोपं नाही. आपले ...