Sunday, 4 November 2012

'तू च सत्य'

तुम्हाला पाहून
वाटलं नह्व्त
कि तुम्ही च ते !
ज्यांना मी आजपर्यंत
शोधत आले
माझ्या स्वप्नात जीवनात !
         कुठे होते तुम्ही आजपर्यंत ?
         कधी मला भेटायची ,
         शोधायची ,
         इच्छा नाही  झाली का ?
मी तर माझे सगळे स्वप्न ,
माझं पुढचं आयुष्य
आणि स्वतःला
आता तुमच्या स्वाधीन करत आहे
         माझ्या कल्पनेच्या कवितेला
         एक नवीन सत्य लाभला आहे
         आणि तुम्ही ?
         तुमच्या हृदयात  काय चालले आहे ?
मी वाट पहाते
तुमच्या  उत्तराची !!

No comments: